मित्रांनो, सेल्फीटाईसपासून सावध रहा


हल्लीच्या तरुणाईला सेल्फीच्या प्रेमाने चांगलंच पछाडलं आहे. या प्रेमापायी आजवर अनेकांना जीव गमवावा लागला. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, अशा कितीही सूचना दिल्या जात असल्या तरी त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. मुख्यत्वे सतत सेल्फी काढणाऱ्यांस सेल्फीटाईस नावाचा मानसिक विकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बोटीत सेल्फी काढण्याचा आणि फेसबुक लाइव्ह करण्याचा प्रयत्न काही तरुणांच्या जिवावर नुकताच बेतला. अतिभारामुळे बोट उलटली आणि काही जणांचा बुडून मृत्यू झाला. अशा ठिकाणी सेल्फी न काढण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत. परंतु अशा सूचनांकडे दुर्लक्ष करण्याचीच प्रवृत्ती अधिक प्रमाणात आढळते.

* गंमत म्हणून सेल्फी काढणे समजण्यासारखे आहे. पण तुम्ही सतत सेल्फी काढत असाल तर हा एक मानसिक विकार आहे, असं लक्षात घ्यायला हवे. या विकाराला “सेल्फीटाईस’ असेही म्हटले जाते. * सतत सेल्फी घ्यावासा वाटणे, सेल्फीशिवाय चैन न पडणे याला ऑब्सेसिव्ह कम्प्लसिव्ह डिसऑर्डर असे म्हटले जाते. त्यामुळे याची लक्षणे वेळीच लक्षात घ्यायला हवीत. * सेल्फी काढण्याची ही सवय शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या घातक ठरू शकते. ही गंभीर बाब लक्षात घेता “सेल्फीटाईस’ म्हणजे नेमके काय, याविषयी जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

* सेल्फीटाईसची सुरवात असेल तर लोक दररोज कमीत कमी तीन वेळा तरी सेल्फी घेतात. पण सगळे सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात नाहीत, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. * मुख्यत्वे सतत सेल्फी घ्यावसे वाटणे, दिवसभरात सहा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा सेल्फी घेणे याला क्रॉनिक सेल्फीटाईस असे म्हटले जाते. * सतत सेल्फी घेत राहिल्याने त्वचेच्या काही समस्या निर्माण होऊ शकतात. फोनमधल्या किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम स्पष्ट दिसू लागतात.

* आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सेल्फीमध्ये आपण सुस्वरूप दिसत नाही अशी भावना बळावली तर डिस्मॉर्फिक डिसऑर्डर हा विकार जन्म घेऊ शकतो. या साऱ्या गंभीर बाबी लक्षात घेता सेल्फीच्या वेडापासून वेळीच स्वत:ला सावरणे गरजेचे ठरणार आहे.

Leave a Comment