Video : अचानक पडू लागला नोटांचा पाऊस, पैसे जमा करण्यासाठी लोकांची लगबग

कोलकाताममाधील एका कमर्शियल बिल्डिंगवरून बुधवारी ( 20 नोव्हेंबर) अचानक नोटांचा पाऊस पडू लागला. बिल्डिंगवरून होणाऱ्या या पैशांच्या पावसाला बघून लोक देखील हैराण झाले. ही घटना मध्य कोलकाताच्या 27 नंबर बँटिंक स्ट्रीट येथे घडली. डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजेंसची टीम बिल्डिंगमध्ये छापा टाकण्यासाठी गेली असताना ही घटना घडली.

बिल्डिंगवरून फेकण्यात आलेल्या नोटांमध्ये 500 व 2000 च्या नोटांचा समावेश होता. सांगण्यात येत आहे की, झाडूच्या मदतीने नोटा खिडकीतून बाहेर फेकण्यात येत होत्या. तेथे उपस्थित लोकांनी जेव्हा नोटांचा पाऊस पडताना बघितला तेव्हा ते हसायला आणि ओरडायला लागले. काहीजण तर पैसे जमा करू लागले.

डीआरआय बिल्डिंगमधील आयात-निर्यात करणाऱ्या कंपनीच्या ऑफिसात छापा टाकण्यासाठी गेले होते. मात्र या फेकण्यात आलेल्या पैशांचा आणि छाप्याचा काही संबंध होता का, याबाबत माहिती मिळाली नाही.

Leave a Comment