चित्रपटात मादकदृश्य देऊनही सावरु शकले नाही या अभिनेत्रींचे करिअर


आपल्या देशात सिनेरसिकांची कमी नाही आहे, त्यातच बॉलीवूडमध्ये आजवर अनेक विषयांवर आधारित चित्रपट आले आहेत आणि याच सिनेरसिकांनी त्या चित्रपटांना भरभरुन प्रेम दिले आहे. बॉलीवूडमधील काही चित्रपट हे केवळ कलाकारांच्या नावावर चालतात हे आपल्याला नाकारुन चालणार नाही. त्यातदेखील एखाद्या चित्रपटाचे यश हे चित्रपटाच्या आशयावर अवलंबून असते. चित्रपट कितीही बिग बजेट असू दे, त्याचा प्रेक्षकांना काही फरक पडत नाही, पण चित्रपटाची कथा चांगली नसेल तर तो सपशेल नाकारला जातो. त्यातच बोल्डनेस आणि ग्लॅमरच्या विश्वासावर सिनेसृष्टीत आलेल्या अभिनेत्रींना प्रेक्षकांनी फारसे गांभीर्याने घेतलेले नाही.


तनुश्री दत्ताने २००४ मध्ये फेमिना मिस इंडिया खिताब जिंकल्यानंतर बॉलिवूडची वाट धरली. ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. तिने या चित्रपटात इमरान हाश्मीसोबत अनेक बोल्ड सीन दिले. हा तिचा पहिला आणि शेवटचा हिट होता. तनुश्रीने यानंतर पुनरागमन करण्याचा प्रयत्नही केला. पण तिला त्यात म्हणावे तसे यश मिळाले नाही.

View this post on Instagram

Photo @sidd_nine

A post shared by ríчα sєn (@riyasendv) on


आतापर्यंत अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटात एका प्रसिद्ध कलाकार कुटुंबात जन्मलेली रिया सेनने काम केले आहे. ती चित्रपटात लहानपणापासूनच काम करत आहे. आपल्या बोल्डनेसने बॉलिवूडमध्ये पाय रोवण्याचा रियानेही प्रयत्न केला. पण इतर अभिनेत्रींप्रमाणे तिलाही यात फारसे यश मिळाले नाही.


अभिनेत्री मल्लिका शेरावत ‘ख्वाहिश’ या पहिल्या चित्रपटात १७ किसिंग सीन देऊन चर्चेत आली होती. यानंतर सुपर हिट चित्रपट मर्डरमध्ये तिने खळबळच माजवली होती. या चित्रपटात मल्लिका शेरावतने दाखवलेला बोल्डनेस आतापर्यंत कोणत्याच चित्रपटात दाखवला गेला नव्हता. त्यामुळे त्या काळात प्रत्येकाच्या तोंडी मल्लिकाच नाव होते. पण तरीही तिचे बॉलिवूडमधील करिअर फार काही गाजले नाही.


२००३ मध्ये ‘जानशीन’ चित्रपटाद्वारे मिस इंडिया सेलिना जेटलीने आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. फरदीन खानसोबत या चित्रपटात तिने अनेक बोल्ड सीन दिले. तिने ‘खेल’, ‘सिलसिले’, ‘नो एन्ट्री’, ‘जवानी- दिवानी’, ‘जिंदा’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘रेड’, ‘शाकालाका बूम- बूम’, ‘मनी है तो हनी है’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘पेइंग गेस्ट’, ‘थँक्यू’ अशा काही चित्रपटांत काम केले. पण तिचेही करिअर फार पुढपर्यंत जाऊ शकले नाही.

View this post on Instagram

Hubbys bday dinner! #funtimes #famjam

A post shared by Geeta Basra (@geetabasra) on


आपल्या बोल्ड अवताराने क्रिकेटर हरभजन सिंहची पत्नी गीता बसरानेही प्रेक्षकांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण इतर अभिनेत्रींप्रमाणे यात तिलाही फारसे यश आले नाही. तिने लग्नाआधी अनेक चित्रपटात काम केले. पण तिच्या पदरी अपयशच पडले. गीताने बॉलिवूडमध्ये द ट्रेन चित्रपटाद्वारे पदार्पण केले. तिच्यासोबत या चित्रपटात इमरान हाश्मी होता.

Leave a Comment