आधारशी जोडले जाणार नाही सोशल मीडिया अकाऊंट – केंद्र सरकार

सोशल मीडिया अकाऊंट आधार कार्डशी जोडण्याची कोणतीही योजना नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोशल मीडिया अकाऊंट आधारशी जोडण्यासंबंधी लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला लिखित स्वरूपात उत्तर दिले.

रविशंकर प्रसाद म्हणाले की, नीति आणि डिझाईननुसार, यूआयडीएआय आधारद्वारे केवळ नागरिकांची माहिती एकत्र केली जाऊ शकते, त्यांच्या पाळत ठेवली जाऊ शकत नाही. सोबतच या अंतर्गत येणारी माहिती केवळ अर्ज अथवा अपडेटेशनच्या वेळीच जोडली जाऊ शकते.

याला कधीच अनइंक्रिप्टेट ठेवले जात नाही व शेअर केले जात नाही. प्रसाद म्हणाले की, आधार हे किमान माहिती आणि संघटित डेटाबेस याच्या सिद्धांतावर आधारित आहे.

Leave a Comment