एमजी मोटर्सचे भारतात फिरते शो रूम

एमजी मोटार इंडियाने आपले मोबाईल (फिरते) शोरूम ‘एमजी एक्सपिरियंस ऑन व्हिल्स’ नावाने लाँच केले आहे. हे मोबाईल शोरूम 45 फूट उंच ट्रेलर आहे. या फिरत्या शोरूमद्वारे कंपनी ज्या मुख्य शहरात (tier 2 आणि tier 3) स्वतःचे अस्तित्व नाही, अशा ठिकाणी प्रवास करेल.

हे मोबाईल शोरूम एकप्रकारे कार आणि डिजिटल अशा दोन्ही गोष्टींचा अनुभव आहे. याद्वारे इतर शहरांमध्ये देखील एमजीला आपले मार्केट वाढवण्यास मदत होणार आहे. याशिवाय ग्रामीण आणि निमशहरी भागातील ग्राहकांशी संपर्क वाढून एसयूव्ही सेग्मेंटमध्ये एमजी स्वतःची दावेदार सिद्ध करम्याचा प्रयत्न करत आहे.

एमजी मोटर इंडियाचे चीफ कमर्शियल ऑफिसर गौरव गुप्ता म्हणाले की, एमजी एक्सपिरियंस ऑन व्हिल्समुळे आम्हाला बाजारात आमची पोहच वाढवता येईल व जेथे आमचे अद्याप शोरूम नाहीत, त्या ठिकाणी ग्राहकांची आवड समजून घेण्यास मदत होईल.

एमजी मोटर इंडियाने काही दिवसांपुर्वीच बंगळुरू येथे डिजिटल स्टुडिओ सुरू केला आहे. या स्टुडिओमध्ये एकही कार नाही. मात्र ग्राहकांना डिजिटल माध्यमातून अनुभव घेता येतो. यामागे ग्राहकांना एक वेगळा व्हिज्युअल अनुभव देणे, हा उद्देश आहे. या डिजिटल टूल्समध्ये व्हॉइस आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसीवर बेस्ड रेकॉग्निशेन असे अनेक टूल्स आहेत.

 

Leave a Comment