कॅनडा सरकारच्या कॅबिनेटमध्ये मंत्री बनत भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांनी रचला इतिहास

निवडणुकीनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सरकार गठन करण्यासाठी कॅबिनेट मंत्र्याची यादी जाहीर केली आहे. यामध्ये इंडो-कॅनेडियन अनिता आनंद यांना देखील पद मिळाले आहे. कॅबिनेटमध्ये भारतीय वंशांच्या अन्य तीन जणांना देखील मंत्रीपद मिळाले आहे.

अनिता आनंद यांनी हाऊस ऑफ कॉमन्ससाठी ऑन्टारियोच्या ओकविले येथील आपला पहिला विजय मिळवला आहे. त्यांना सार्वजनिक सेवा आणि खरेदी विभागाचे मंत्री बनविण्यात आले आहे.

नवीन मंत्रीमंडळानंतर ट्रुडो म्हणाले की, आज मी मजबूत, विविधता आणि अनुभव असलेली टीम सादर करत आहे. जी मोठमोठ्या समस्यांना सोडवण्यासाठी एकत्र काम करेल.

कॅनडाच्या केंटविले येथे जन्म झालेल्या अनिता या युनिवर्सिटी ऑफ टोरंटोमध्ये लॉ च्या प्रोफेसर आहेत. त्यांच्या आई-वडिल भारतीय होते. त्यांची आई सरोज राम यांचे निधन झाले असून, त्या अमृतसरच्या होत्या. तर त्यांचे वडिल एसवी आनंद तामिळ होते.

अनिता यांना 4 मुले आहेत. अनिता ओकविले भागात इंडो-कॅनेडियन समुदायाशी जोडलेल्या आहेत. त्या Canadian Museum of Hindu Civilisation च्या पहिल्या चेअरपर्सन होत्या.

Leave a Comment