आता किती पेट्रोल भरले याचे थेट मोबाईलवर येणार नॉटिफिकेशन

अनेक पेट्रोल पंपावर होणाऱ्या फसवणुकीपासून सुटका करण्यासाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी एक असे तंत्रज्ञान तयार केले आहे, ज्याद्वारे तुमच्या वाहनात नेमके किती पेट्रोल-डिझेल टाकले याची अचूक माहिती मिळेल. याचे नॉटिफिकेशन तुम्हाला थेट मोबाईलवर येईल. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी प्रोफेसर नचिकेता तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली फ्यूल क्वांटिफायर डिव्हाईस तयार केले आहे.

पेट्रोल पंपाची चोरी पकडणे आता सहज सोपे होणार आहे. आयआयटीचे प्रोफेसर नचिकेता यांनी सांगितले की, फ्यूल क्वांटिफायर डिव्हाईस कोणत्याही कार, मोटारसायकल, स्कूटरमध्ये लावले जाऊ शकते. खास गोष्ट अशी की हे तंत्र लावण्यासाठी वाहनात कोणतेही बदल करण्याची गरज नाही.

पेट्रोल टँकमध्ये हे डिव्हाईस लावण्यात येईल. ज्याच्या मदतीने त्याच्या मदतीने समजेल की गाडीत किती पेट्रोल आहे. त्याचे नॉटिफिकेशन मोबाईलवर येईल. यानंतर ग्राहक पेट्रोल पंपावरील मीटर आणि मोबाईलमध्ये आलेल्या माहितीची तुलना करू शकतील. हे डिव्हाईस ब्लूटूथशी कनेक्टेड असेल.

प्रोफेसर नचिकेता यांनी सांगितले की, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी, एमटेकच्या विद्यार्थ्यांनी हे डिव्हाईस तयार केले आहे. हे डिव्हाईस तयार करण्यासाठी 8 महिने लागले. याच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला आहे. लवकरच हे डिव्हाईस बाजारात उपलब्ध होईल व याची किंमत देखील अधिक नसेल.

Leave a Comment