देशभक्ती असावी तर अशी, या गावांमधील प्रत्येक घरातील एक मुलगा आहे देशासाठी कार्यरत

उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथील जडवड आणि काटिया ही गाव देशभक्तीसाठी उदाहरण आहे. ही दोन्ही गाव बाजूबाजूलाच असल्याने दोन्हींची नावे एकत्र घेतली जातात. येथील 150 पेक्षा अधिक युवक सिव्हिल पोलीस आणि भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. शेतकरी कुटूंबातील ही मुल मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्य करत आहेत.

(Source)

जिल्हा मुख्यालयापासून 40 किमी लांब असलेल्या या गावातील तरूण इतरांसाठी प्रेरणास्थान आहेत. देशाचे संरक्षण करत असताना नक्षलवाद्यांशी लढताना सीआरपीएफचे कोब्रा बटालियनचे जवान हरवेंदर पंवार शहीद झाले.

(Source)

गुर्जर बहुल या गावात युवक सकाळ-संध्याकाळ सैन्य आणि अर्धसैन्य दलात भरती होण्यासाठी मेहनत घेत असतात. दिवसाची सुरूवात यज्ञाला आहुती देऊन होते. दिवस-रात्र युवक अभ्यास करत असतात. शेतीत मदत करणे आणि देश सेवेचे स्वप्न या व्यतरिक्त युवकांना काहीही सुचत नाही.

(Source)

आज गावातील 150 पेक्षा अधिक तरूण सैन्यात व इतर दलांमध्ये देश सेवा करत आहे.

(Source)

कटिया गावाचे प्रमुख तपेंद्र कुमार यांनी सांगितले की, गावातील प्रत्येक कुटूंबातील 1 सदस्य तरी देश सेवेसाठी कार्यरत आहे. जिल्हा पंचायत सदस्य नजर सिंह म्हणाले की, सेवा ही इच्छा आणि जोशद्वारे होते. मग ती देशाची असो, अथवा आपल्या संस्कृतीची. गावातील युवक सैन्यात भरती होऊन या दोन्ही गोष्टी करत आहेत.

(Source)

जडवड गावाचे प्रमुख मेहरचंद सांगतात की, माझे भाग्य आहे की मला प्रमुख बनून गावाची सेवा करण्याची संधी मिळाली. येथील प्रत्येक घरात देशभक्ती आहे. या गावासाठी देशसेवेपेक्षा मोठे काहीही नाही.

Leave a Comment