आता ट्विट करता येणार शेड्यूल

सोशल नेटवर्किंग वेबसाईट ट्विटरने आपल्या युजर्ससाठी एक खास फीचर आणले आहे. या फीचरमुळे आता युजर्सला आपले ट्विट शेड्यूल करता येणार आहे. सध्या हे फीचर केवळ वेब अॅपवरच वापरता येत आहे.

ट्विटरडेकने ट्विट करत या फीचरची माहिती दिली आहे. यामध्ये लिहिण्यात आले आहे की, आजपासून युजर्स ट्विट शेड्यूल करू शकतात. आम्ही ट्विटरडेकवर युजर्ससाठी टाइम-सेव्हिंग फीचर प्रयोग म्हणून आणत आहोत. तुम्हाला या फीचरबद्दल काय वाटते ते आम्हाला सांगा.

ट्विटरचे हे फीचर सध्या कोणत्या युजर्ससाठी आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. जर तुम्हाला एखादी महत्त्वाची माहिती ठराविक वेळेत तुमच्या युजर्सला द्यायची असेल तर तुम्ही ट्विट शेड्यूल करू शकता.

या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम Tweetdeck.com वर जावे लागेल. यानंतर लॉग इन केल्यावर मुख्य पेज ओपन होईल. त्यानंतर डाव्या बाजूला ट्विटर कंपोज करण्याचा पर्याय दिसेल. तेथे तुम्हाला + हे चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्हाला हवे असलेले ट्विट शेड्यूल करू शकता. तुम्ही तुम्हाला हवे त्या वेळी आणि तारीख निश्चित करून ट्विट शेड्यूल करू शकता.

Leave a Comment