या पाकिस्तानी नवरीने का घातले आहेत टॉमेटोचे दागिने ?

पाकिस्तानमध्ये 1 किलो टोमॅटोची किंमत 300 रुपयांपेक्षा अधिक आहे. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान टोमॅटो हे सोन्यापेक्षा कमी नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक नवरीने सोन्याच्या ऐवजी टोमॅटोचे दागिने घातलेले आहेत. हा व्हिडीओ पाकमधील पत्रकार नायला इनायतने आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत नायलाने लिहिले की, टॉमेटोचे दागिने, जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही तुमच्या आयुष्यात सर्वकाही बघितले आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 26 हजार पेक्षा अधिक युजर्सनी बघितला आहे. तर 2 हजारांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.

युजर्स या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स करत आहेत.

व्हिडीओमध्ये नवरी सांगत आहे की, तिच्या देशात टोमॅटो खूप महाग झाले आहेत आणि पाइन नट्सची किंमत सोन्याएवढी झाली आहे. याच कारणामुळे तिने सोन्याच्या जागी टोमॅटोचे दागिने घातले. तिने सांगितले की, तिच्या मोठ्या भावाने पाइन नट्स भेट म्हणून दिले आहेत. तर आई-वडिलांनी तीन सुटकेस भरून टॉमेटो दिले आहेत.

Leave a Comment