पोलीस दलात दाखल झालेला रोबॉट करणार तक्रार नोंदवण्यापासून ते निवारणापर्यंतची कामे

सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी आंध्र प्रदेश पोलिसांनी पहिल्यांदाच रोबॉट सायबिराची (सायबर सिक्युरिटी इंटरेक्टिव रोबोटिक एजेंट) नेमणूक केली आहे. हा रोबॉट तक्रारी नोंदवण्यापासून ते गुन्ह्याचा तपास करण्यामध्ये पोलिसांना मदत करेल.

दिनेश कुमार इरावत यांनी सांगितले की, आंध्र प्रदेशमध्ये पहिल्यांदाच रोबॉटचे लाँचिंग करण्यात आले. याला ई-कॉपच्या आधारावर तयार करण्यात आलेले आहे. याचा उद्देश पोलिसांचे काम सोपे करणे आणि प्रक्रिया जलद करणे हे आहे. हा रोबॉट पोलिसांना मदत करेल व त्यांचा वेळ वाचवेल.

दिनेशनुसार, जर कोणत्याही कारणामुळे तपास अधिकारी प्रकरणाचे निराकरण करू शकला नसेल. तर रोबॉट 24 तासांच्या आत ही माहिती वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यमंत्री ऑफिसला देतो. समस्या सोडवण्यासाठी याच्यामध्ये 138 प्रकारचे एप्लिकेशन इंस्टॉल करण्यात आले आहेत. यामध्ये 13 कॅमेर आहेत, जे 360 डिग्रीवर 24 तास 7 दिवस काम करतात. यामुळे जर एखादा गुन्हेगार कॅमेऱ्यासमोरून गेल्यास रोबॉट कंट्रोल रूमला याची माहिती देतो.

सायबिराला स्टार्ट अप कंपनी रोबो कपलर प्रायव्हेट लिमिटेडने तयार केले आहे. कंपनीचे सीईओ प्रवीण मल्ला यांनी सांगितले की, एकदा तक्रार नोंदवल्यानंतर सायबिरा संबंधित तक्रारधारक आणि तपास अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत एक पावती पाठवतो. रोबॉटमध्ये कोणत्याही तक्रारीचे निवारण करण्यासाठी अधिकतम तीन दिवसांची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. रोबॉट व्हॉइस कमां आणि टायपिंगद्वारे तक्रार नोंदवतो. टायपिंगसाठी याला लॅपटॉपशी कनेक्ट करण्यात आले आहे.

 

Leave a Comment