…म्हणून या सरकारी बाबूने ऑफिसात लावली मी भ्रष्टाचारी नसल्याची पाटी

तेलंगणाच्या एका सरकारी ऑफिसमध्ये प्रवेश करताच समोर ‘आय एम अनकरप्टेड’ म्हणजेच ‘मी भ्रष्टाचारी नाही’, असे लिहिलेले दिसते. असे लिहिण्यामागे कारण देखील खास आहे. वीज विभागात काम करणारे एडिशनल डिव्हीजनल इंजिनिअर अशोक पोदेती हे काम करायला येणाऱ्या ठेकेदारांच्या ऑफरला वैतागले आहेत. त्यामुळे त्यांनी ही हटके पद्धत वापरली.

त्यांनी कॉन्ट्रॅक्टर आणि सर्व सामान्य लोकांना सांगितले की, ते लाच घेत नाहीत. जेव्हा लोक त्यांना लाच देण्यास अयशस्वी ठरले, तेव्हा त्यांनी त्रास देण्यास सुरूवात केली. अखेर वैतागून त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये मी इमानदार असल्याची पाटी लावली. यानंतर त्यांच्या सोबत काम करणारे इतर अधिकारी देखील त्यांना ते पुर्ण विभागावर आरोप लावत आहेत, असे म्हणून त्रास देत आहेत.

अशोक यांच्या या हटके कल्पनेमुळे भ्रष्ट अधिकारी देखील घाबरले आहेत. ते म्हणाले की, मी लहानपणापासूनच भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. जर मी लाच घेतली तर मला द्यावी देखील लागेल. येथील वीज विभाग भ्रष्ट आहे. मी लोकांना सांगू इच्छितो की, अधिकाऱ्यांना लाच देऊ नका. त्यांना त्यांच्या कामाचा पगार मिळतो. जर तुमचे काम झाले नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करा. मीडियामध्ये जा. मात्र लाच देऊ नका.

अशोक यांनी 2005 मध्ये असिस्टेंट इंजिनिअर म्हणून नोकरी स्विकारली आहे. मागील अनेक वर्षांत त्यांना अनेकवेळा लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Leave a Comment