सोनिया गांधी यांचा महाशिवआघाडीस कौल, सरकार स्थापन्याचा मार्ग मोकळा !


नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस अशी नव्याने आकारास येत असलेल्या महाशिवआघाडीला हिरवा कंदील मिळाल्याचे वृत्त असून दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात काँग्रेसचे जेष्ठ आणि केंद्रीय नेत्यांची एक बैठक पार पडली. नव्याने आकारास येणारी आघाडी आणि या आघाडीतील किमान समान कार्यक्रम या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या बैठकीस मल्लिकार्जुन खरगे, ए. के. अँटोनी, के. सी. वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित होते. सोनिया यांनी कौल देताच शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीद्वारे राज्यात सत्तास्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राष्ट्रवादीचा काँग्रेसचा शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या आघाडीस पाठिंबा आहे. पण काँग्रेस नेतृत्व खास करुन सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा विरोध असल्याने सरकार स्थापनेच्या चर्चा लांबणीवर पडत असल्याची चर्चा होती. त्यामुळे हे संभवित असलेली ही महाशिवआघाडी हे सरकार स्थापन करण्याच्या चर्चा लांबणीवर पडत होत्या. पण, किमान समान कार्यक्रम आणि राज्यातील या नव्या आघाडीवर काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली आणि सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एक बैठक पार पडत आहे. दोन्ही पक्षाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीसोबतच्या बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडल्याने ही चर्चा सरकार स्थापनेच्या अंतिम निर्णयाप्रत पोहोचली असावी, असे मानले जात आहे.

राज्यातील पक्षीय बलाबल पाहता

  • भाजप (BJP) – 105
  • शिवसेना (Shiv Sena) – 56,
  • राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 54
  • काँग्रेस(Congress) – 44
  • बहुजन विकास आघाडी – 03
  • प्रहार जनशक्ती – 02
  • एमआयएम – 02
  • समाजवादी पक्ष – 02
  • मनसे – 01
  • माकप – 01
  • जनसुराज्य शक्ती – 01
  • क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01
  • शेकाप – 01
  • रासप – 01
  • स्वाभिमानी – 01
  • अपक्ष – 13

Leave a Comment