७० वर्षीय रामू काका दररोज ३०० लोकांना १० रुपयांमध्ये देतात पोटभर जेवण


मदुराई : आपल्या आजुबाजूला गोरगरीबांना मदत करणारे अनेक मसिहा असतात. पण आपल्या देशात एक असाही मसीहा आहे, जो गरीबांना केवळ दहा रुपयात पोटभर जेवण देतो. त्यांचे नाव रामू काका असे असून ७० वर्षीय रामू काका तामिळनाडूमधील मदुराई शहरात राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते भुकेलेल्या, गोरगरीबजनांना केवळ दहा रुपयांत पोटभर जेवण देतात.

ज्या ठिकाणी लाखो, करोडोचे घोटाळे उघडकीस येतात तिथे १० रुपयांती किंमत ती काय? मुंबई सारख्या ठिकाणी फार फार तर एखादा वडापाव या किंमतीत मिळेल. पण सध्याच्या घडीला दहा रुपयाची किंमत काय असते ती जेव्हा तुम्ही तामिळनाडूच्या मदुराईत शहरात भुकेलेले असाल आणि हातात केवळ दहा रुपये असतील तर याच खुप मोठ महत्त्व तुम्हाला कळेल. कारण येथे केवळ दहा रुपयात पोटभर अन्न मिळणार आहे. रामू यांचे शहरातील अण्णा बस स्टँडजवळ हॉटेल आहे. लोकांकडूनदेखील त्यांच्या या भल्या स्वभावाचे कौतुक होत असून त्यांचा आदर करतात. लोक त्यांना प्रेमाने ‘रामू ताता’ म्हणून हाक मारतात. १४ वर्षांचे असताना रामू आपल्या घरातून पळून आले होते. तेव्हापासून ते मदुराई येथेच राहतात.

मदुराई येथील एका मठमध्ये तेथील गरिब लोक ज्यांच्याकडे एकावेळच्या अन्नासाठीही पैसे नाहीत ते जेवण्यासाठी येत असत. त्यांच्या मनात या भुकेलेल्यांसाठी काम करण्याची इच्छा निर्माण झाली. त्याच दरम्यान १९६७ मध्ये रामू आणि त्यांच्या पत्नीने एक दुकान भाड्याने घेतले. रामू यांनी तिथे हॉटेलचा व्यवसाय सुरु केला. त्यावेळी रामू यांनी हॉटेलमध्ये इडली, डोसा सारखे पदार्थ ठेवले होते. यापैकी कोणताही पदार्थ घेतल्यास ते फक्त १० रुपये घेत असत. १० रुपयांत तीन इडल्या मिळत असल्याने लोकांचीही चांगली गर्दी होत होती. रामू यांची लोकप्रियता दर्जेदार जेवणामुळे दिवसेंदिवस वाढत होती.

मग रामू यांनी ब्रेकफास्ट देण्यावर सिमीत न राहता जेवणही ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण विशेष म्हणजे जेवणासाठीही फक्त १० रुपये आकारले जातात. त्यांच्या हॉटेलमध्ये रोज जवळपास ३०० लोक जेवण्यासाठी येतात. जर एखाद्या दिवशी अन्न संपले तर ग्राहकांना पैसे देऊन दुस-या एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण्यास ते सांगतात. आताच्या जगात अस करणारा कोणता हॉटेल मालक शोधून तरी सापडणार आहे का?

त्याचबरोबर आपल्या कमाईतील काही भाग रामू हॉटेलमध्ये काम करणा-या कामगारांसोबत शेअर करतात. सोबतच त्यांना कामाचा मोबदलाही देतात. पण इतक्या कमी दरात जेवण देत असल्याने त्यांची इतकी चांगली कमाई होत नाही. पण जितकी कमाई होते, त्यातील काही भाग ते आपल्या कामगारांसोबत न चुकता शेअर करतात.

Leave a Comment