भारतीय वैज्ञानिकांनी तयार केले पुरूषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन

गर्भनिरोधक म्हटले की, यासंबंधी महिलांची जबाबदारी समजली जाते. जर पुरूषांनी कंडोमचा वापर केला नाही तर महिलांना गर्भवती व्हायचे नसते, अशांना गर्भनिरोधकच्या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करावा लागतो. यामध्ये गर्भनिरोधक गोळ्या, कॉन्ट्रेसेप्टिव रिंग, आययूडी आणि इमर्जेंन्सी कॉन्ट्रेसेप्टिव गोळ्यांचा वापर केला जातो. मात्र आता पुरूषांसाठी देखील गर्भनिरोधक इंजेक्शन तयार करण्यात आले आहे.

हे बर्थ कंट्रोल इंजेक्शन 13 वर्ष प्रभावी राहिल. हे इंजेक्शन पुरूषांच्या groin म्हणजेच पोट आणि जांघेच्या मधल्या ठिकाणी लावले जाईल. या इंजेक्शनचे क्लिनिकल ट्रायल देखील यशस्वी झाले आहे. हे इंजेक्शन शरीरात एक पॉलिमर सोडेल, ज्याद्वारे वीर्य टेस्टिक्सल बाहेर निघण्यापासून रोखेल. या इंजेक्शनला लोकल ऐनस्थीसियाच्या डोससोबत दिले जाईल.

या इंजेक्शनला भारतीय काउसिंग ऑफ मेडिकल रिसर्चच्या वैज्ञानिकांनी तयार केले आहे. वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, या इंजेक्शनला ट्रायल वेळी 300 रुग्णांना देण्यात आले व यातील कोणालाही साइड इफेक्ट जाणवले नाहीत.

सध्या या इंजेक्शनला भारतीय रेग्यूलेटरी बॉडीकडून परवानगी मिळायची आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर हे इंजेक्शन नसबंदीसाठी चांगला पर्याय असेल. हे जगातील पहिले पुरूष गर्भनिरोधक आहे.

 

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment