सार्वजनिक ठिकाणी केबल, यूएसबी पोर्टद्वारे मोबाईल चार्ज केल्यास होऊ शकते डाटा चोरी

अनेकदा आपण मोबाईल, लॅपटॉप अथवा टॅबलेटची बॅटरी संपत आल्याने रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट किंवा हॉटेल या सारख्या ठिकाणी लावण्यात आलेल्या चार्जिंग केबल किंवा यूएसबी पोर्टद्वारे डिव्हाईस चार्ज करतो. मात्र अशाप्रकारे चार्ज केल्यामुळे तुमच्या डिव्हाईसद्वारे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. तुमची खाजगी माहिती देखील चोरीला जाऊ शकते.

एवढेच नाही तर तुमचा फोन, लॅपटॉप देखील कायमस्वरूपी लॉक केला जाऊ शकतो. जगभरातील मोठमोठे हॅकर सार्वजनिक यूएसबी आणि केबलमध्ये मालवेअर लावून लोकांची खाजगी माहिती चोरी करत आहे. याला ज्यूस जँकिंग ( Juice Jacking ) असे म्हटले जाते.

सायबर विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा लोक सार्वजनिक यूएसबी पोर्ट अथवा केबलद्वारे फोन, लॅपटॉपसारखे डिव्हाईस चार्जिंग करतात, त्यावेळी मालवेअर सर्व माहिती हॅकरपर्यंत पोहचवतो. ज्याप्रकारे एटीएम हॅकर्स डेबिट कार्डची माहिती चोरी करतात. त्याचप्रकारे यूएसबी चार्जिंग पोर्टमध्ये हार्डवेअर लावून डाटा चोरी केला जातो.

यापासून वाचण्यासाठी रेल्वे, विमान अथवा हॉटेल याठिकाणी आधीपासूनच लागलेल्या चार्जिंग केबलचा वापर करू नका. स्वतःच्या चार्जर आणि केबलचाच वापर करा.

 

Leave a Comment