सावधान ! बाजारात विकले जात आहे बनावटी जिरे

मिठाईपासून ते मसाल्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत भेसळ केल्याचे तुम्ही आतापर्यंत पाहिले असेल. मात्र आता या यादीत जिऱ्याचे नाव जोडले गेले आहे. आता जिरे खरेदी करताना सावध रहा, कारण बाजारात बनावटी जिरे आले आहे.

जिऱ्यांमुळे जेवणाचा स्वाद तर वाढतोच, मात्र ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. दिल्ली पोलिसांनी बनावटी जिरे बनविणाऱ्या एका फॅक्ट्रीवर छापा टाकला आहे. येथे एक खास गवत, दगड आणि गुळापासून बनावटी जिरे बनविण्यात येत होते. पोलिसांनी फॅक्ट्रीमधून 20 हजार किलो बनावटी जिरे आणि 8 हजार किलो कच्चा माल जप्त केला आहे.

बनावटी जिरे बनवणाऱ्यांच्या फॅक्ट्र्या उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर येथील जलालाबाद येथे आहेत. आरोपींनी सांगितले की, हे जिरे बनविण्यासाठी जास्त मेहनत लागत नाही. यासाठी केवळ गवत, दगडाचा भूगा आणि गुळ या 3 गोष्टी लागतात. एक खास प्रकारचे गवत उत्तर प्रदेशमध्ये 5 रुपये किलो मिळते. हे खास गवत नदीच्या किनाऱ्यावर उगते. या गवताला जिऱ्याप्रमाणे छोटी-छोटी पाने असतात. त्यामुळे याला ओळखणे अवघड जाते.

गवताच्या या छोट्या पानांना गुळाच्या पाण्यात टाकून नंतर सुखवले जाते.  त्यानंतर याला दगडाच्या पावडरमध्ये मिसळले जाते. जिऱ्या सारखा रंग येण्यासाठी यात स्लरी पावडर मिसळली जाते.

बाजारात खऱ्या जिऱ्याचा भाव 300 रुपये किलो आहे तर बनावटी जिरे 20 रुपये किलोमध्ये विकले जाते. हे बनावटी जिरे आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात.

Leave a Comment