आता आठवडाभर खुली राहणार आधार सेवा केंद्र


नवी दिल्ली: आता आठवड्यातील सातही दिवस देशभरातील आधार सेवा केंद्र खुली राहणार आहेत. ‘यूआयडीएआय’ने नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन देशभरातील आधार सेवा केंद्रे आठवड्यातील सातही दिवस खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही केंद्रे याआधी दर मंगळवारी बंद असायची. ही माहिती ‘यूआयडीएआय’ने ट्विटरद्वारे दिली आहे.

आता सातही दिवस ‘यूआयडीएआय’द्वारे सुरू केलेली आधार सेवा केंद्र खुली राहतील. या आधार सेवा केंद्रांची दररोज १००० आधार एनरॉलमेंट किंवा रिक्वेस्ट अपडेट करण्याची क्षमता आहे.

तुम्ही पासपोर्ट सेवा केंद्रांच्या धर्तीवर सुरू केलेल्या आधार सेवा केंद्रांवर जाण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊ शकता. नव्या आधार कार्डसाठी अर्ज किंवा एनरॉल करण्यासह तुम्ही यूआयडीएआय डेटाबेसमध्ये नावे, पत्ता, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, जन्मतारीख, लिंग अथवा बायोमेट्रिक डेटा (फिंगरप्रिंट किंवा आयरिस) आधार केंद्रात बदलून घेऊ शकता.

Leave a Comment