अशा प्रकारे जाणून घ्या तुमचा फोन कॉल रेकॉर्ड होत आहे का


तुमचे फोन कॉल जर कोणी तुमच्या परवानगीशिवाय रेकॉर्ड करत असेल तर ते तुम्ही स्वत: देखील तपासू शकता. आपल्या परवानगीशिवाय भारतासह अनेक देशांमध्ये कॉल रेकॉर्ड केले जातात. हे कॉल रेकॉर्ड होत आहेत की नाहीत हे आता तुम्हालाही चेक करता येईल. पण, असे रेकॉर्डिंग सरकारी एजन्सीकडून केले जात असेल तर ते शक्य नाही. टेलिकॉम कंपन्यांच्या मदतीने सरकारी संस्था कॉल रेकॉर्ड करतात ते समजत नाही. पण, तसे इतर कोणी करत असेल तर तुम्हाला ते ओळखता येऊ शकते.

तुम्हाला जेव्हा एखादा कॉल येतो तेव्हा जर काही सेकंदानंतर बीपचा आवाज आला तर तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे असे समजा. तुम्ही अशा वेळी विचारू शकता.

फोन ओव्हर हिटिंग ही एक सर्वसामान्य समस्या असली तरी वारंवार होत असेल तर लक्ष देण्याची गरज आहे. काऱण असेही कॉल रेकॉर्डिंग होऊ शकते. असे एखादे अॅप तुमच्या फोनमध्ये असते ज्यामुळे रेकॉर्डिंग इतरत्र पाठवले जाते. त्यासाठी बॅकग्राउंडला सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे ओव्हर हिटिंगची समस्या निर्माण होते. कोणत्या गोष्टीसाठी तुमचा डेटा वापरला गेला हे समजते. तुम्ही वापर केलेला नसतानाही कधी कधी डेटा संपल्याचे दिसत असेल तर नक्कीच तुमच्या फोनमधील डेटा चोरला जात असण्याची शक्यता असते.

याचा त्रास फोनमध्ये लिमिटेड अॅप वापरणाऱ्यांना होत नाही. पण अशी अनेक अॅप्स असतात जाहिरातींचा ज्यावर भडिमार असतो. बॅकग्राउंड सिस्टिम त्या अॅप्समधून कॉल रेकॉर्ड करू शकते. कोणतेही नोटिफिकेशन तुमच्या फोनवर न येता किंवा त्याचा वापर सुरू नसतानाही स्क्रिन ऑन होणे किंवा सायलंट होण्याचे प्रकार होत असतील किंवा सेल्फी कॅमेरा सुरु होत असेल तर तुमच्या फोनमध्ये हेरगिरी केली जात असल्याची शक्यता आहे.

फोन शट डाउन करण्याची प्रोसेस जेव्हा पूर्ण होते तेव्हा बॅकग्राउंडमध्ये सुरु असलेली सर्व अॅप्स बंद होतात. जर कॉल रेकॉर्डिंग किंवा इतर स्पाय अॅप असतील तर मोबाईल बंद होण्यास उशिर लागतो. तुम्हाला जर न समजणारे मेसेज येत असतील ज्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स, सिम्बॉल असतील तर त्यापासून सावध रहा.

असा कोणताही प्रकार स्मार्टफोनमध्ये आढळला तर तुमच्या फोनमधील अॅप चेक करा. फोनमध्ये कोणतेही अॅप इन्स्टॉल करताना आपण त्यासाठी काय काय परवानगी देतो ते तपासून पाहा. त्याचबरोबर कोणती माहिती इतर अॅपमधून गोळा केली जाते हेसुद्धा चेक करा. तसेच वरीलपैकी काही समस्या वारंवार येत असतील तर फोनचा बॅकअप घेऊन फॅक्टरी रिसेट करा.