आपल्या व्यवसायातील 51% भागीदारी तब्बल 4320 कोटी रुपयांना काईली जेनर


जगप्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री आणि मीडिया पर्स्नालिटी काईली जेनर ही सेलिब्रेटी आणि बिजनेसवूमन अशा दोन्ही भूमिकांमध्ये एकाच वेळी दिसते. दरम्यान काईली आता आपल्या कॉस्मेटिक्स व्यवसायातील 51 टक्के भागीदारी विकणार असून तब्बल 60 कोटी अमेरिकन डॉलर (भारतीय चलनात सुमारे 4320 कोटी रुपये) एवढ्या किमतीला ती कोटी या कंपनीस विकणार आहे. कोटी न्यूयॉर्क ही कॉस्मेटिक्स फर्म असून कवरगर्ल यांसारखे अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय असणारे ब्रांड या कंपनीकडे आहेत. जेनर हिची कंपनी काइली कॉस्मेटिक्सची कोटीने किंमत 1.2 अब्ज डॉलर एवढी केली आहे. आपल्या पार्टनरशिपची घोषणा दोन्ही कंपन्यांनी सोमवारी केली. काइली ब्रांड या वेळी जगभरात विस्तारीत आणि नव्याने लोकांपुढे आणला जाईल असा दावा दोन्ही कंपन्यांनी केला.

View this post on Instagram

happy place.

A post shared by Kylie ♥️ (@kyliejenner) on


काइली जेनर हिच्या कंपनीसोबतच्या कराराच्या माध्यमातून कोटी न्यूयॉर्क ही कंपनी अनेक रिअॅलिटी टीव्ही स्टार जेनर हिच्या चाहत्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणार आहे. जेनर हिचे सोशल मीडियावर तब्बल 27 कोटी फॉलोअर्स आहेत. जेनर हिने कोटी न्यूयॉर्क सोबतच्या डीलवर म्हटले की, मला आणि माझ्या टीमला ही भागीदारी प्रत्येक प्रोडक्टच्या क्रिएशन आणि डेव्हलपमेंटसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे.


काइली जेनर ही जगातील सर्वात कमी वयाची अब्जाधीश म्हणून ओळखली जाते. गेल्या वर्षी तिच्या कंपनीची वार्षिक विक्री 36 कोटी डॉलर एवढा राहिली. 2018 मध्ये फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत तिचा उल्लेख यंगेस्ट सेल्फ-मेड बिलेनियर असा करण्यात आला होता. हा विक्रम या आधी फेसबुकच्या मार्क जकरबर्ग याच्या नावावर होता. 23 व्या वर्षी तो अब्जाधीश बनला होता.

View this post on Instagram

found my flounder… 🐠

A post shared by Kylie ♥️ (@kyliejenner) on


प्राप्त माहितीनुसार, कोटी न्यूयॉर्क यी भागिदारीतून फ्रेगरेंस, कॉस्मेटिक्स आणि स्किनकेयर बिजनेस या माध्यमातून पुढच्या 3 वर्षांपर्यंत 1% पेक्षाही अधिक नफा मिळवण्याचा विचार करत आहे. दरम्यान, दोन्ही कंपनीची अंतिम बोलणी आर्थिक वर्ष 2020 च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. कोटी न्यूयॉर्क कंपनीला कॉस्मेटिक्स ब्रांड मधून मिळालेला नफा गेल्या वर्षी 17.7 कोटी एवढा होता.

Leave a Comment