जॉनी सिन्सने मिया खलिफाला सांगितली पॉर्न इंडस्ट्रीमधील यशाची गुरुकिल्ली


पॉर्नस्टार मिया खलिफा हे पॉर्न इंडस्ट्रीमधील सर्वाधिक चर्चेतील नावांपैकी एक असून अवघ्या तीन महिन्यांमध्ये पॉर्न इंडस्ट्रीला रामराम ठोकणारी मिया सध्या सर्वसामान्य जीवन जगत आहे. पण असे असले तरी तिच्यावर पॉर्नस्टारचा लागलेला लेबर अद्यापही पुसला गेलेला नाही. याबाबत एका मुलाखती दरम्यान तिने खुलासा केला आहे. आपल्यापैकी अनेकांचा पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या पॉर्नस्टारला बक्कळ पैसा मिळतो असा समज असल्याचे तिने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. पण तिच्या याच व्हिडिओवर जॉनी सीन्स या पॉर्नस्टार्सने रिप्लाय दिला आहे. त्याने या रिप्लायमध्ये पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पैसा कसा कमवायाचा याची माहिती मियाला दिली आहे. सध्या हा रिप्लाय चर्चेचा विषय बनला आहे.

नुकतीच ‘बीबीसी’ला पॉर्नस्टार म्हणून ओळख असणारी मिया खलिफा हिने एक मुलाखत दिली. मियाने २०१४-१५ दरम्यान तीन महिन्यांसाठी पॉर्न इंडस्ट्रीत काम केले होते. तिने या मुलाखतीमध्ये तीन महिन्यांच्या या कारकिर्दीमुळे आयुष्यभरासाठी आपल्यावर पॉर्नस्टार असल्याचा ठपका बसल्याची खंत बोलून दाखवली. त्याचबरोबर अनेकांचा मी खूप श्रीमंत असल्याचा समज आहे, तो पूर्णपणे चुकीचा असल्याचे स्पष्टीकरणही मियाने या मुलाखती दरम्यान दिले होते. मी पॉर्न स्टार असताना लाखो रुपयांची कमाई केली, असा अनेकांचा समज आहे, पण हे पुर्णतः चुकीचे आहे. केवळ १२ हजार डॉलर म्हणजे ८ लाख ५२ हजार ६०६ रुपये या विश्वात मी कमावले आहे. मला या पैशांव्यतिरिक्त एकही रुपया जास्त मिळाला नाही. त्याचबरोबर ही इंडस्ट्री सोडल्यानंतर मला सामान्य नोकरी मिळविण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला. तो काळ प्रचंड भितीदायक होता, असे मियाने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. आपल्या ट्विटरवरुनही या मुलाखतीचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे.


जॉनी सीन्सने याच ट्विटला रिप्लाय केला आहे. तुम्ही दुसऱ्या कंपनीसाठी जेव्हा काम करता तुम्ही दर दिवसाचे मानधन तेव्हा ठरवून घ्यायला हवे. म्हणजेच किती दिवस आणि किती दृष्यांचे चित्रीकरण तुम्ही करता यावर तुमची कमाई अवलंबून असते. म्हणजेच जर बारा दिवस काम केले तर १२ हजार डॉलर आणि ३६५ दिवस केले तर सरासरी ३६५ हजार डॉलर कमाई करु शकता. म्हणूनच या क्षेत्रात पैसे कमवण्यासाठी स्वत: स्वत:चा कंटेंट चित्रित करणे महत्वाचे असल्याचे जॉनीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment