फेसबुकने लाँच केले ‘फेसबुक पे’


गुगल आणि अॅपलच्या पावलावर पाऊल ठेवत फेसबुकने देखील पैसै भरण्यासाठी आपली नवी सुविधा ‘फेसबुक पे’ लाँच केली आहे. गेल्या आठवड्यापासून अमेरिकेत ‘फेसबुक पे’ सुरू झाले असून लवकरच ही सुविधा भारतात देखील उपलब्ध करुन दिली जाणार आहे. युजर्सना ‘फेसबुक पे’च्या माध्यमातून व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामवर पेमेंट करणे सोपे जाणार आहे.

‘फेसबुक पे’ वापरण्यासाठी काही सोप्या टिप्स

  • यासाठी तुम्हाला ‘फेसबुक अॅप’मधील सेटिंगमध्ये जावे लागेल.
  • त्यानंतर तेथे असलेला ‘फेसबुक पे’चा पर्याय निवडा लागेल.
  • पुढे तुम्ही कोणत्या पद्धतीने पेमेंट करणार आहात तो पर्याय निवडावा लागले.
  • सर्वकंपन्यांच्या डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड फेसबुक उपलब्ध असून इतरही काही पेमेंट प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत.
  • युजर्सना ऑथेंटिकेशनसाठी पिन किंवा डिव्हाइस बायोमॅट्रिकला जोडणे गरजेचे आहे. बायोमॅट्रिकबाबत अनेक युजर्स साशंक असतात. पण कोणत्याही प्रकारे युजर्सची माहिती फेसबुक स्टोअर करत नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच फेसबुक अकाउंटसोबत होणारे गैरव्यवहार रोखण्यात येणार आहेत. फेसबुक पेवर युजरच्या अकाउंटची हिस्ट्री दिसणार आहे.

Leave a Comment