रंगीबेरंगी शर्ट


सध्याच्या आधुनिक जगात सतत नवनवीन फॅशन्स येत आहेत. फॅशन्सच्या बदलाचा वेग एवढा आहे की, कालपरवाची फॅशन आज आऊटडेटेड झालेली असते. सध्याच्या फॅशनविश्‍वात वेगाने बदल होत आहेत. त्यामुळे तरुणाईला हटके फॅशन्सचा अवलंब करण्यास बराच वाव मिळत आहे. त्यात आजकाल शर्टच्या प्रकारात बरेच वैविध्य पहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकांच्या वॉर्डरोबमध्ये आकर्षक आणि नावीन्यपूर्ण शर्टसनी स्थान मिळविले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे, आकर्षक शर्टस बाजारात उपलब्ध होत असल्याने निवडीला बराच वाव मिळत आहे. परिणामी अनेकांच्या वॉर्डरोबमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शर्टस पहायला मिळत आहेत.

* शर्टसमध्ये सध्या प्रिंट्‌स या प्रकाराचीही चलती असल्याचे दिसते. प्रिंट्‌समुळे तुमच्या लूकला चार चॉंद लागतात. मुख्यत्वे यात वेगवेगळ्या प्रिंट्‌सचे शर्ट उपलब्ध आहेत. यातील हटके प्रिंट्‌सची निवड करून छान दिसू शकता.

* डेनिम शर्टशिवाय तुमचा वॉर्डरॉब अपूर्ण आहे, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे छानसा डेनिम शर्ट विकत घ्यायला हवा.

* हल्ली रंगीबेरंगी शर्टसपेक्षा पांढऱ्या शर्टला अधिक पसंती दिली जात आहे. तुम्हीही पांढऱ्या शर्टसचा वापर केला तर स्टायलिश दिसण्यास मदत होईल. परंतु त्यासाठी योग्य फिटिंगचा शर्ट निवडायला हवा. त्यात शर्टला कॉंट्रास्ट ठरणारी निळी कॉलर असेल तर हे कॉम्बिनेशन उठून दिसेल आणि तुमचे व्यक्‍तिमत्त्व आणखी आकर्षक दिसण्यास मदत होईल.

* शर्टच्या दुनियेत साधा पांढरा शर्ट हाही ऑप्शन उपलब्ध आहेच. शिवाय कॉलरलेस व्हाइट कुर्ता स्टाइल शर्टही तुम्हाला स्टायलिश दिसण्यास मदत करेल. डेनिम किंवा फॉर्मल ट्राउझरसोबत हा कुर्ता उठून दिसू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे.

* या शिवाय व्हाइट बेस ठेवून तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स आणि स्टाईलचे शर्ट कॅरी करू शकता.

* रंगीत शर्टसमध्ये इलेक्‍ट्रिक ब्लू, सी ग्रीन, मस्टर्ड रंगाचे शर्ट एथनिक दिसतात. या रंगांनी तुमचा वॉर्डरॉब सजवायला हवा. त्यातील अशा शर्टसचा आवश्‍यकतेनुसार वापर करणे शक्‍य होते.

* शर्टमधील लिनन हा प्रकार तुम्ही कधीही कॅरी करू शकता. याचे कारण लिनन कोणत्याही ऋतूत चालते. हे लक्षात घेता लिननचा एक शर्ट तुमच्या वॉर्डरॉबमध्ये असायलाच हवा.

Leave a Comment