सोशल मीडियात व्हायरल झाले अभिनेत्री शमा सिकंदरचे बोल्ड फोटो


कधी आपल्या अभिनयामुळे तर कधी आपल्या बोल्ड फोटोंमुळे बॉलीवूड अभिनेत्री शमा सिकंदर कायम चर्चेत असते. तिचा असाच एक बोल्ड फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. तिने बिकिनी परिधान केलेला मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे.


या मोनोक्रोम फोटोमध्ये शमा शर्ट आणि टोपीमध्ये बिकिनीसह पोज देत आहे. हा फोटो खूप मादक आहे आणि त्यात शमाचे भाव पाहण्यासारखे आहेत. हे फोटो अतिशय बोल्ड असून तिने इंस्टाग्रामवर टाकले आहेत.


शमा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तसेच, ती चाहत्यांना तिच्या प्रोजेक्ट्स आणि आयुष्याबद्दल सांगत राहते. शमाने फोटो टाकल्यानंतर ते लगेच व्हायरल झाले आहेत. त्यावर तिला कमेंटही आल्या आहेत.


दरम्यान शमा सिकंदर नुकत्याच आलेल्या बायपास रोड चित्रपटात दिसली होती. नील नितीन मुकेश स्टारर या चित्रपटात शमाने एका मॉडेलची भूमिका साकारली होती.


हा चित्रपट बर्‍याच जणांना आवडला आहे, त्यामुळे या चित्रपटातील कलाकार खूप खूश आहेत. याबद्दल बोलताना शमा म्हणाली, बायपास रोड चित्रपटानंतर मला मिळणारे प्रेम पाहून खूप चांगले वाटत आहे. जनता आणि माझ्या चाहत्यांना माझी कामगिरी आवडली. मी स्वत: स्क्रीनिंगमध्ये माझ्या काही चाहत्यांना भेटले आणि त्यांनी माझ्या व्यक्तिरेखेचे कौतुक केले. माझ्या जवळच्या लोकांना देखील माझे काम आवडले.


शमा सिकंदरने प्रेम अगन (1988) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण तिला टीव्ही मालिका ये मेरी लाइफ है मुळे ओळख मिळाली. तिने बर्‍याच चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.