एसपार्कने लाँच १.६९ सेकंदात ताशी १०० किमी वेग पकडणारी वेगवान पिकअप कार


दुबई – दुबई मोटार शोदरम्यान जगातील सर्वात वेगवान पिकअपची (अॅक्सलरेशन) कार आऊल जपानी कार निर्माती कंपनी एसपार्कने सादर केली. केवळ १.८९ सेकंदात ही कार ताशी १०० किमी वेग पकडू शकते.

ही एक इलेक्ट्रिक कार असून नुकतेच तिला जागतिक स्तरावर लाँच करण्यात आले आहे. तिचा सर्वाधिक वेग ताशी ४०० किमी आहे. केवळ ५० कार या मॉडेलच्या बनवण्यात आल्या आहेत. सुमारे २२ कोटी रुपये या कारची किंमत आहे.

या कारची बुगाटी चिरॉन, लॅम्बोर्गिनी अव्हेंटोर, मॅकलरेन पी 1 आणि फेरारी सारख्या कारशी स्पर्धा असेल. पिकअपच्या बाबतीतही या कारने टेस्ला रोडस्टरला मागे टाकले आहे.

रोडस्टर 1.9 सेकंदात 100 किमी ताशी वेग पकडू शकते. स्पार्क आउलचे वजन फक्त 861 किलो आहे. 2018 फॉर्म्युला वन रेसर कारपेक्षा हे 120 किलो जास्त आहे. ही इलेक्ट्रिक हायपर कार संपूर्णपणे कार्बन फायबरने बनलेली आहे.

Leave a Comment