MP4 व्हिडीओ डाऊनलोड करणे टाळा, व्हॉट्सअ‍ॅपवर होऊ शकते हॅक - Majha Paper

MP4 व्हिडीओ डाऊनलोड करणे टाळा, व्हॉट्सअ‍ॅपवर होऊ शकते हॅक

जर तुम्हाला कोणी व्हॉट्सअ‍ॅपवर MP4 व्हिडीओ फाईल पाठवली तर ती डाऊनलोड करणे टाळा. कारण हा व्हिडीओ डाऊनलोड केल्यामुळे तुमचा फोन हॅक होऊ शकते व तुमची संपुर्ण माहिती चोरीला जाऊ शकते.

ही एक वेगळ्या प्रकारे बनविण्यात आलेल्या एमपी4 फाइल आहे. जी RCE म्हणजेच रिमोट कोड एक्सिक्यूशन आणि DoS म्हणजेच डिनायल ऑफ सर्विस सायबर अटॅक आहे. या धोक्यापासून वाचण्यासाठी कंपनीने युजर्सला व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करण्यास सांगण्यात आलेले आहे.

अशाप्रकारचे व्हिडीओ पाठवून मालवेअर फोनमध्ये इंस्टॉल होते व त्याद्वारे माहिती चोरीला जाण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपुर्वीच इस्त्रायलच्या एनएसओ ग्रुपद्वारे पेगासस स्पायवेअरचा वापर करून जगभरातील 1400 लोकांची व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मोबाईल हॅक केले होते.

Leave a Comment