5,000mAh ची दमदार बॅटरी असणारा व्हिवोचा स्मार्टफोन लाँच

स्मार्टफोन कंपनी व्हिवोने आपला नवीन फोन व्हिवो वाय19 भारतात लाँच केला आहे. या महिन्याच्या सुरूवातीला कंपनीने हा फोन थायलंड लाँच केला होता. या फोनची खास गोष्ट म्हणजे यात वॉटरडॉप-नॉच आणि ट्रिपल रिअर कॅमेरा यात देण्यात आला आहे.

भारतात व्हिवो वाय19 च्या 4जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,990 रुपये आहे. ई-कॉमर्स साईट्स अमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम आणि टाटा क्लिकवर 20 नोव्हेंबरपासून या फोनची विक्री सुरू होईल. हा फोन मॅग्नेटिक ब्लॅक आणि स्प्रिंग व्हाइट या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

(Source)

ड्युअल नॅनो सिम असणारा हा स्मार्टफोन अँड्राईड पायवर आधारित फनटच ओएस 9.2 वर चालतो. यामध्ये 6.53 इंचचा फूल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा आस्पेक्ट रेशिओ 19.5:9 आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यामध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हिलियो पी65 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळेल.

(Source)

गेमिंगसाठी यात अल्ट्रा गेमिंग मोड देखील मिळेल. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 16 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा मिळेल. याशिवाय 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फ्रंटला 16 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल.

याशिवाय या स्मार्टफोनची आणखी एक खास गोष्ट म्हणजे यात 5000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 18 वॉट चार्जिंग सपोर्टसोबत येते. कनेक्टिविटीसाठी यात 4जी वीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस/ए-जीपीएस आणि माइक्रो-यूएसबी 2.0 सारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत.

Leave a Comment