नवीन वर्षात दाखल होणार टिव्हीएसची नवीन क्रुझर बाईक

बजाजच्या एव्हेंजर आणि सुझुकीच्या इंस्ट्रुडरला टक्कर देण्यासाठी आता टिव्हीएस मोटर देखील नवीन क्रुझर बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. टिव्हीएसच्या नवीन क्रुझर बाईकचे नाव Zeppelin असेल. ही बाईक नवीन वर्षाच्या सुरूवातीला भारतात लाँच होईल. टिव्हीएस Zeppelin बाईक टू-टोन कलर स्कीनसोबत नेक्ड स्ट्रीट डिझाईन ऑफर करेल. यामध्ये कंफर्टेबल रायडिंग पोजिशन, हँडलबार-माउंटेड मिरर आणि गोल्डन कलर्ड फ्रंट फोर्क्स असतील.

(Source)

या बाईकमध्ये हेक्सँग्नल आकाराचा हेडलँप, स्पोक्ड व्हिल्स असेल. याशिवाय हेडलँप, टर्न इंडिकेटर्स, टेललाइट्ससाठी एलईडी लायटिंग सेटअप असेल. या क्रुझर बाईकमध्ये 220 सीसी सिंग्ल सिलेंडर, फ्यूल इंजेक्टेड इंजिन आहे. ज्यामध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे. इंजिन 8,500 rpm वर 20 bhp चे मॅक्सिमम पॉवर जनरेट करते. तर 7,000 rpm वर 18.5 Nm टार्क जनरेट करते.

(Source)

सेफ्टीबद्दल सांगायचे तर टिव्हीएस Zeppelin ला फ्रंट आणि रिअर व्हिल्समध्ये डिस्क ब्रेक्स असतील. याशिवाय यात इंप्रुव्हड रोड हँडेलिंगसाठी ड्यूल चॅनेल ABS असेल. संस्पेशनसाठी बाइकच्या फ्रंटमध्ये 41 एमएन कन्वेंशनल टेलिस्कोपिक फोर्क असेल. या क्रुझर बाईकची किंमत 1.25 ते 1.30 लाखांपर्यंत असू शकते.

Leave a Comment