150 कोटी वेळा डाउनलोड झाले टिकटॉक, भारतात सर्वाधिक युजर्स

शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टिकटॉकने गुगल प्ले स्टोरवर जगभरात 150 कोटी डाउनलोड्सचा आकडा पार केला आहे. याशिवाय हे अ‍ॅप सर्वाधिक 46.68 कोटी वेळा भारतातच डाउनलोड करण्यात आलेले आहे. हा आकडा इतर इंस्टॉल्सपेक्षा 31 टक्के अधिक आहे. मोबाईल इंटेलिजेंस फर्म सेंसर टॉवरच्या रिपोर्टनुसार, 2019 मध्ये या अ‍ॅपला 64.4 कोटीवेळा डाउनलोड करण्यात आले आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी अधिक आहे.

या वर्षी टिकटॉक भारतात खूपच लोकप्रिय झाले आहे. यावर्षी केवळ भारतातच 27.76 कोटी वेळा हे अ‍ॅप डाउनलोड करण्यात आले आहे. जे जगभरातील डाउनलोड्सच्या 45 टक्के आहे.

चीन या यादीत दुसऱ्या स्थानावर असून, तेथे 4.55 कोटी वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. हा आकडा मागील वर्षीच्या तुलनेत 7.4 टक्के अधिक आहे. 3.76 कोटी डाउनलोड्स सह अमेरिका तिसऱ्या स्थानावर आहे.

सध्या 61.4 कोटी डाउनलोड्स सह टिकटॉक सर्वाधिक वेळा डाउनलोड करण्यात आलेले तिसरे नॉन-गेमिंग अ‍ॅप आहे. 70.74 कोटी डाउनलोड्स सह व्हॉट्सअ‍ॅप पहिल्या स्थानावर आहे तर 63.42 कोटी डाउनलोड्स सह फेसबुक मेसेंजर तिसऱ्या स्थानावर आहे.
फेब्रुवारीमध्ये टिकटॉकने 100 कोटी डाउनलोड्सचा आकडा पार केला होता. आता केवळ 9 महिन्यांच्या आत अ‍ॅपने 150 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Leave a Comment