सुदर्शन पटनायक ठरले हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय

सुदर्शन पटनायक हे एक प्रसिद्ध वाळू शिल्पकार आहेत. काही दिवसांपुर्वीच त्यांना इटलीतील इटॅलियन गोल्डन सँड आर्ट अवार्ड 2019 या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले सुदर्शन पटनायक पहिले भारतीय आहेत.

इटलीतील लेचे येथे 13 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल स्कोरानो सँड नेटिव्हिटी कार्यक्रमात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी रशियन शिल्पकार पॅवेल मिनिकोव यांच्यासोबत मिळून महात्मा गांधी यांची 10 फूट उंच वाळूचे शिल्प तयार केले. लोकांना ही कलाकृती खूपच आवडली.

या कार्यक्रमात वेगवेगळ्या देशांमधील 8 शिल्पकारांनी भाग घेतला होता. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुदर्शन पटनायक हा पुरस्कार मिळाल्यानंतर म्हणाले की, मला खूप अभिमानास्पद वाटत आहे. भारतासाठी ही सन्मानाची गोष्ट आहे.

याआधी देखील त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यापासून ते दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या अनेक कलाकृती तयार केल्या आहेत.

एखाद्या कलाकाराचे काम हे आपल्या कलेद्वारे समाजाला विविध गोष्टीविषयी जागृक करणे हे असते. सृदर्शन यांनी प्रदुषण, बेटी बचाओ सारख्या अभियानांचे शिल्प साकारली आहे.

Leave a Comment