
रतलाम : 121 वर्षांपासून उर्दू भाषेतील श्रीमद् भगवत गीता मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्याच्या जावरामध्ये एका मुस्लिम कुटुंबाने सांभाळून ठेवली आहे. कुरआन शरीफप्रमाणेच कुटुंबातील तीन पिढ्यांनी याची काळजी घेतली आहे. 1898 मध्ये संस्कृतमधून या पुस्तकाचा अनुवाद उर्दूमध्ये केला गेला होता. कॉन्ट्रॅक्टर अनीस अनवर (57) यांच्या संग्रहात ही भगवत गीता आहे. वेळ मिळाल्यास ते ती वाचतात आणि याचे वाचन त्यांना आयुष्यातील मार्ग दाखवते.
121 वर्षांपासून या मुस्लिम कुटुंबियांनी सांभाळून ठेवली आहे उर्दू भाषेतील श्रीमद् भगवत गीता
मथुराचे पंडित जानकीनाथ मदन देहलवी यांनी 1898 मध्ये गीतेचा संस्कृतमधून उर्दूमध्ये अनुवाद केला होता. पंडित रामनारायण भार्गव यांच्यामार्फत मथुरा प्रेसमधून प्रकाशित ग्रंथामध्ये श्रीमद् भगवत गीतेचे पाठ आणि महत्वपूर्ण श्लोक उर्दू आणि पारशी भाषेमध्ये अनुवादित केले आहेत. संस्कृतमधून 121 वर्षांपूर्वी उर्दूमध्ये याचा अनुवाद करण्याचा हेतू मुस्लिम वर्गाला गीतेबद्दल माहिती देण्याचा होता.
15 मार्च 1898 ला झाले अनुवादित गीतेचे प्रकाशन होते. त्याची किंमत त्यावेळी 6 पैसे होती. 230 पानांमध्ये गीतेच्या 18 अध्यायांचे अनुवाद आहे. अनीस अनवर यांनी सांगितले कुरआन शरीफसह इतर धर्म ग्रंथही ते एकत्र ठेवतात. अनीस अनवर म्हणतात, संस्कृतहुन उर्दूमध्ये प्रकाशित केलेल्या या पुस्तकामध्ये पेज नंबर 41 वर असलेल्या “यं हि नव्यथयंत्येते पुरुषं पुरुषर्षभ। संदु:ख सुखंधीरं सौअमृतत्वायकल्पते।।’’ या श्लोकाने अनीस अनवर खूप जास्त प्रभावित आहेत. या श्लोकाचा अर्थ आहे ज्या मनुष्याला शरशनेही काही फरक पडत नाही आणि जो सुख दुखत एकसारखाच राहातो. तो अमर होतो. अनीस कुटुंबमित्र किशोर शाकल्यसोबत याचे पठण करतात.
