आता वेबसीरिजच्या माध्यमातून भेटीला येणार रिंकू राजगुरु


मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या सैराट चित्रपटानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु खूप दिवसांनी कागर चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. पण तिच्या कागर चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

View this post on Instagram

😊

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on


त्यानंतर आता ती कोणत्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. त्यातच आता ती एका वेबसीरिजमध्ये झळकणार असल्याचे वृत्त आहे.

View this post on Instagram

Eid e milad Mubarak🙏💐

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on


ती एका बड्या डिजिटल प्लॅटफॉर्मसोबत काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. मुंबईतील माटुंग्याच्या एका चाळीमध्ये या वेबसीरिजचे चित्रीकरण सुरू आहे. तिच्यासोबत या वेबसीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता देखील झळकणार आहे. सध्या अनेक कलाकार डिजिटल माध्यमाकडे वळले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on


रिंकूनेही वेबसीरिजची निवड केली आहे. या वेबसीरिजचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. पण, त्याचे चित्रीकरण जोरात सुरू असल्याचे वृत्त आहे. या वेबसीरिजमध्ये ती चाळीत राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबामधील एका मुलीची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे.

Leave a Comment