आता जिओच्या ग्राहकांना लँडलाइनवरील कॉलला मोबाईलवरून देता येणार उत्तर

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन सेवा देत आहे. आता जिओने आपल्या लँडलाइन सेवेला अपडेट केले आहे. या अपडेटद्वारे युजर्स लँडलाइनवरील कॉलचे उत्तर थेट मोबाईल फोनवरून देखील देऊ शकतील.

रिलायन्स जिओने एक नवीन अ‍ॅप जिओ कॉल सादर केला आहे. ज्याद्वारे लँडलाइनवरील कॉलचे उत्तर मोबाईलवरून देता येईल. याशिवाय ग्राहकांना लँडलाइनच्या नंबरवरून व्हिडीओ कॉल करण्याची देखील सुविधा मिळेल.

अशाप्रकारे कॉलिंग करण्यासाठी जिओच्या ग्राहकांकडे जिओ सिम आणि जिओ फायबर कनेक्शन असणे गरजेचे आहे. तसेच, जिओ कॉल अ‍ॅप गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल स्टोरवरून डाऊनलोड करू शकतात.

कॉल करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला जिओ कॉल अ‍ॅपवर जाऊन फिक्स्डलाइन प्रोफाइल ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर 10 आकडी लँडलाइन नंबर कॉन्फिगर होईल. आता लँडलाइन नंबरद्वारे कॉल करण्यासोबतच कॉलचे उत्तर देखील देता येईल. याशिवाय जिओ टिव्ही फायबरद्वारे व्हिडीओ कॉल देखील करता येईल.

जिओ आपल्या ग्राहकांना या अ‍ॅपमध्ये आरसीएस सेवा देईल. याद्वारे एसएमएस, रिच कॉल, ग्रुप चॅट, फाइल शेअरिंग आणि स्टिकर्स सारखे फीचर्स मिळतील. मात्र या सेवेचा वापर करण्यासाठी इतरांकडे देखील आरसीएस सर्विस असणे गरजेचे आहे.

Leave a Comment