उशीर होणार असल्यास प्रवाशांना रेल्वेकडून मिळणार एसएमएसद्वारे माहिती

आता प्रवाशांना रेल्वेला उशीर होणार असल्यास ताटकळत स्टेशनवर वाट बघत थांबावे लागणार नाही. प्रवाशांच्या सुविधेसाठी भारतीय रेल्वे आता प्रवाशांना रेल्वेच्या रियल टाइम अपडेट्स देणार आहे.

हिवाळ्यामध्ये धुके पसरते. अशावेळी रेल्वे आणि विमानांना उशीर होतो. त्यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून रेल्वे एसएमएसच्या माध्यमातून प्रवाशांना रेल्वेच्या रियल टाइम माहिती पाठवेल.

जर रेल्वेला 1 तासांपेक्षा अधिक उशीर होणार असेल, तर प्रवाशांना मेसेज येतील. लवकरच ही सेवा सुरू होईल.

या संदर्भात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी देखील ट्विट करत माहिती दिली.

या सुविधेमध्ये प्रवाशांना त्यांची रेल्वे उशीरा येणार असेल तर मेसेज करून त्याबद्दल माहिती दिली जाईल. प्रवाशांना रेल्वेचे लोकेशन, रेल्वेला स्टेशनवर पोहचण्यासाठी लागणारा अंदाजित वेळ सांगितला जाईल. रात्री 11 ते सकाळी 7 पर्यंत स्पेशल पेट्रोलिंग टीमची नेमणूक करण्यात येईल. याशिवाय रेल्वेमध्ये सेफ्टी डिव्हाईसेज लावले जातील. ज्याद्वारे रेल्वेच्या ड्राईव्हरला सिग्नल पोस्टवर ऑडिओ-व्ह्यूजवल माहिती मिळेल.

Leave a Comment