या राष्ट्रपतींच्या ताफ्यात दाखल झाली ‘मेड इन इंडिया’ इलेक्ट्रिक स्कूटर

महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीने काही दिवसांपुर्वीच Peugeot Motorcycles (पीएमटीसी) अधिग्रहक करणार असल्याची घोषण केली होती. आता प्यूजो मोटारसायकल्सच्या मेड इन इंडिया इलेक्ट्रिक स्कूटरचा फ्रांसच्या राष्ट्रपतींच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे.

(Source)

नवीन Peugeot e-Ludix इलेक्ट्रिक स्कूटरला भारतातून फ्रांसमध्ये एक्सपोर्ट करण्यात आले आहे. फ्रांस राष्ट्रपतींच्या ताफ्यास समावेश करण्यात आलेली ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटर करत याबाबत माहिती दिली.

(Source)

प्यूजो ई-लुडिक्स इलेक्ट्रिक स्कूटरची मॅन्यूफॅक्चेरिंग मध्य प्रदेश येथील महिंद्राच्या पीथमपूर प्लांटमध्ये करण्यात आले आहे. त्यानंतर या स्कूटरला फ्रांसमध्ये पाठवले जाते. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3kW इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. स्कूटरचे वजन केवळ 85 किलो आहे.

ई-लुडिक्समध्ये लिथियम-आयन बॅटरी आहे. याची बॅटरी रिमूवेबल आहे. स्कूटरला पुर्ण चार्ज होण्यासाठी 3 तास लागतात. फूल चार्जमध्ये ही स्कूटर 50 किमी चालते.

Leave a Comment