… तर सहा महिने खराब होणार नाही रसगुल्ला

रसगुल्ल्याची आवड असणारे अनेकजण नेहमी तक्रार करतात की, त्यांच्या आवडीची मिठाई लगेच खराब होते. आता जाधवपूर युनिवर्सिटीच्या फूड टेक्नोलॉजी विभागा यावर उपाय शोधणार आहे. युनिवर्सिटीचे वैज्ञानिक खाद्य संरक्षक म्हणजेच फूड प्रिजर्वेटिव्ह विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्याद्वारे रसगुल्ला 6 महिने खराब होणार नाही. यासाठी राज्य सरकारसोबत मिळून काम करण्यात येत आहे.

विभागाचे एक वरिष्ठ प्रोफेसर म्हणाले की, या प्रकारच्या रसगुल्ल्यांना मशीनद्वारे बनविण्यात येईल. विभाग डायबेटिक रसगुल्ला बनविण्याचे तंत्र विकसित करत आहे. मधुमेह असणारे देखील याचा आनंद घेऊ शकतील. 14 नोव्हेंबर 2017 ला पश्चिम बंगालला रसगुल्ल्याचा जीई टॅग मिळालेला आहे. यानंतर राज्य सरकारने 14 नोव्हेंबरला 2019 ला रसगुल्ला दिवस साजरा केला होता.

राज्याचे पशूसंवर्धन मंत्री स्वपन देबनाथ यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणानंतर ऑटोमॅटिक मशीनद्वारे रसगुल्ला बनविण्याचा प्लाँट सुरू करण्यात येईल. याला युनिवर्सिटीच्या मानकांनुसार तयार करण्यात येईल व मदर डेअरी ब्रँड अंतर्गत विकण्यात येईल.

Leave a Comment