पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर घेऊन प्रवाशांना जाणार स्वीडनची विमान कंपनी, एवढे आहे तिकीट


स्टॉकहोम- 2023 मध्ये प्रवाशांना पहिल्यांदाच पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर स्वीडनमधील विमान कंपनी ओशियन स्काय घेऊन जाईल. याची तिकीट विक्री कंपनीने आतापासूनच सुरू केली आहे. प्रवाशांना उत्तर ध्रुवावर जाण्यासाठी प्रति व्यक्ती 46 लाख रुपये (50 हजार पाउंड) मोजावे लागतील.

खास हायब्रिड विमान उत्तर ध्रुवावर जाण्यासाठी तयार केले जात आहे, टेस्टींगदरम्यान जे 2017 मध्ये अपयशी झाले होते. फाइव्ह स्टार हॉटेलसारख्या सुविधा यात दिल्या जातील. नॉर्वेच्या आइलँड समूह स्वालबारवरुन हे विमान सुरू होईल. 36 तासांच्या या प्रवासात प्रवाशांना 6 तास ग्राउंडवर फिरावे लागेल, जेवणदेखील त्यांना बर्फात दिले जाईल.

Leave a Comment