व्यायामाचे पाच फायदे


व्यायाम केल्याने आपली प्रकृती चांगली रहाते हे काय कोणाला माहीत नाही का? सर्वांना माहीत आहे पण काय करणार ? व्यायायाचा कंटाळा येतो. म्हणून सर्वांनी नियमितपणाने व्यायाम करण्याचे पाच मुख्य फायदे लक्षात घेतले पाहिजेत. साधारणत: हृदय बळकट होणे, मधुमेहाची शक्यता कमी होणे, स्नायू दणकट असणे हे व्यायामाचे लाभ असतात पण तरीही काही खास फायदे आहेत.

१. नित्य व्यायाम करणारांना शांत झोप लागते. आणि शांत झोप ही उत्तम आरोग्याची गुरूकिल्ली मानली जाते. अनेकांना झोप चांगली येत नसल्याने झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात पण व्यायाम करणारांना झोपेसाठी गोळ्या घेण्याची गरज नसते.

२.सर्दीचा त्रास कमी – जवळपास सर्वांनाच अधुन मधून सर्दीचा त्रास होत असतो. काहीही कारण नसताना काहींना व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी होते. ही सर्दी रोगप्रतिकार शक्ती कमी असण्याचे लक्षण आहे. नियमित व्यायाम करणारांना हा त्रास होत नाही. या संबंधात एक हजार लोकांवर तुलनात्मक अभ्यासच करण्यात आला आहे. सर्दी झाली की झोप शांत होत नाही आणि अनेक नवे त्रास सुरू होतात.

३. निरोगी डोळे – व्यायाम करण्याबाबत नियमित असणारांचे डोळे चांगले असतात. त्यातल्या त्यात त्यांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्याची गरज कधीच जाणवत नाही. या संबंधात तर ५० हजार जणांचे निरीक्षण करण्यात आले आहे. दररोज चालण्याचा व्यायाम करणारांना डोळ्यांचे त्रास कमी असल्याचे दिसले आहे.

४. बहिरेपणा – अमेरिकेत ६८ हजार परिचारिकांवर प्रयोग करण्यात आला. दररोज व्यायाम करणार्‍या आणि न करणार्‍या परिचारिकांत काय काय फरक पडतो हे २० वर्षे पाहण्यात आले तेव्हा असे दिसून आले की, आठवड्यातून किमान पाच दिवस फिरायला जाणारांना बहिरेपणा येण्याची शक्यता कमी होती. याच परिचारिकांच्या बाबतीत इतरही अनेक निरीक्षणे करण्यात आली. त्यांच्या लघवीच्या सवयी पाहिल्या गेल्या तेव्हा असे आढळले की, व्यायाम करणार्‍या परिचारिकांना लघवीचे कसलेही त्रास कमी होते. त्यामानाने व्यायाम न करणार्‍या परिचारिकांना कसले ना कसले त्रास होते. त्यांना वारंवार जावे लागते असे दिसून आले. असाच फरक पुरुषांच्या बाबतीतही असल्याचे दिसून आले. व्यायाम न करणारांता मलावरोधाचेही प्रमाण जास्त दिसून आले. असे लहान सहान त्रास कमी होण्यासाठी नित्य व्यायाम केला पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment