हितसंबंध प्रकरणी बीसीसीआयच्या ‘दादा’ला क्लीन चीट


कोलकाता – हितसंबंध प्रकरणात नितीन अधिकारी आणि लोकपाल डी. के. जैन यांच्याकडून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुली याला क्लीन चिट मिळाली आहे. अभिषेक दालमिया यांना क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा (सीएबी) माजी अध्यक्ष गांगुलीने आपला राजीनामा सुपूर्त केला.

गांगुलीने राजीनामा दिला असून त्यानंतर त्यांच्याशी संबंधित हितसंबंधाचा कोणताही मुद्दा नसल्याचे जैन यांना आढळून आले आहे. मी २३ ऑक्टोबर २०१९ ला बंगालच्या क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ताबडतोब भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला असल्याचे गांगुलीने दालमिया यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आपल्या आदेशात जैन यांनी नमूद केले की, गांगुलीसंदर्भात कोणत्याही हितसंबंधाचा माझ्या दृष्टीने मानला जात नाही. म्हणूनच सध्याची तक्रार निकाली काढली जात आहे. तक्रारदार, गांगुली आणि बीसीसीआयला या आदेशाच्या प्रती पाठवण्यात आली आहे. याबाबतची तक्रार मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे आजीवन सभासद संजीव गुप्ता यांनी दिली होती. ते बीसीसीआयच्या एजीएममध्ये कॅब अध्यक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून अनेक पदांवर कार्यरत असल्याचा त्यांनी दावा केला होता.

Leave a Comment