या चित्रपटासाठी आलिया शिकावी लागणार काठियावाडी भाषा


अभिनेत्री आलिया भट्ट वेश्यव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या वस्तीमध्ये दंतकथा बनलेल्या ‘गंगूबाईं’वर आधारित आगामी चित्रपटात ‘गंगूबाईं’ची ही भूमिका साकारणार आहे. आलियाला निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटासाठी काठियावाडी बोली शिकावी लागणार असल्याचे वृत्त आहे. ही व्यक्तिरेखा साकारणे हे आलियासाठी खूप आव्हानात्मक असल्याचे म्हटले जात आहे.

तिला ‘गंगूबाई काठियावाडी’मधील भूमिकेसाठी नवी बोली शिकावी लागणार आहे. गंगूबाई या चित्रपटात काठियावाडीत बोलताना दिसणार आहे. काठियावाडी भाषा सौराष्ट्रच्या आसपास बोलली जाते. लवकरच काठियावाडी शिकायला आलिया सुरुवात करणार आहे.

चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी मेहनत आणि त्यासाठी नव्या गोष्टी शिकणे हे आलियासाठी काही नवे नाही. ती यापूर्वीही तिच्या चित्रपटातील भूमिकेसाठी अशा भाषा शिकली आहे. तिने ‘२ स्टेट्स’ चित्रपटासाठी तमिळ शिकण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर ‘राझी’साठी तिने उर्दूचे धडेही गिरवले असल्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारणे आलियासाठी हे खूप आव्हानात्मक असल्याचे म्हटले जाते आणि मी त्यासाठी तयार असल्याचे आलिया अनेकदा सांगते.

Leave a Comment