आमिर खानने शेअर केले ‘लाल सिंह चड्ढा’चे नवे पोस्टर


सध्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान व्यस्त आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच आमिरने सोशल मीडियावर शेअर केले आहे. लोकप्रिय हॉलिवूड सुपरस्टार टॉम हँक्स यांची मुख्य भूमिका असलेल्या ऑस्कर विजेत्या ‘फॉरेस्ट गम्प’ चित्रपटाच्या कथेवर आमिरचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा बेतलेला आहे. जगभरात व्हिएतनाम युद्धावर बेतलेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ चित्रपटाचे चाहते आहेत. सिनेरसिकांना या चित्रपटाने नितांत सुंदर अनुभव दिला. आमिर या इंग्रजी चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवत आहे.


अमेरिकेच्या इतिहासातील मोठ्या घटना ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटातून टॉम हँक्सने पडद्यावरून समोर आणल्या होत्या. आता भारतातील विभाजन आणि त्यानंतर घडलेल्या घटनांना ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दाखवले जाणार आहे. ऑपरेशन ब्लू स्टार आणि बाबरी मशीद पाडल्याच्या घटनांचा यात समावेश आहे. आमिर खान प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात देशातील काही इतिहासातील संवेदनशील घटनांची झलक पाहायला मिळणार आहे.

फॉरेस्ट गंप या चित्रपटाला हिंदीत बनवने हा प्रमुख उद्देश आहे. तो म्हणजे आपल्या देशातील महत्त्वपूर्ण इतिहासाच्या घटना मोठ्या पडद्यावर आणणे हे असल्याचे सूत्रांनी सांगितले. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करणार असून कथा अतुल कुलकर्णी चित्रपटाची लिहिली आहे. हा चित्रपट २०२० च्या डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment