पार्किंगमधून गाडी चोरीला गेल्यास जबाबदारी हॉटेलची – सर्वोच्च न्यायालय

हॉटेलमध्ये गेल्यास तुमच्या पार्किंग केलेल्या गाडीची संपुर्ण जबाबदारी आता हॉटेलची असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, एकदा गाडीची चावी पार्किंगच्या आधी अथवा नंतर हॉटेलच्या स्टाफला दिली तर त्यानंतर गाडीची संपुर्ण जबाबदारी ही हॉटेलची असेल. अशावेली गाडी चोरीला गेली अथवा काही नुकसान झाले तर हॉटेलला याची भरपाई द्यावी लागेल.

सर्वोच्च न्यायालयाने ही बाब राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या निर्णयाला योग्य ठरवत म्हटले आहे. ग्राहक आयोगाने दिल्लीतील ताजमहल हॉटेलवर 2.8 लाखांचा दंड लावला होता. ही रक्कम हॉटेलच्या बाहेरून 1998 मध्ये चोरीला गेलेल्या मारूती झेनच्या मालका देण्याचे आदेश देण्यात आले होते. आयोगाने या घटनेला हॉटेलचा बेजबाबदारपणा असल्याचे म्हटले होते. आयोगाने म्हटले होते की, ग्राहकांची गाडी ज्या स्थितीमध्ये पार्क करण्यात आली होती, त्याच स्थितीत पुन्हा मिळायला हवी.

न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, हॉटेल दंड अथवा भरपाई देण्यास तेव्हाच जबाबदार असेल जेव्हा हॉटेलची चूक झाल्याचे सिद्ध होईल.

Leave a Comment