मागील 5 वर्षात सोशल मीडिया इनफ्लुएंसर्सच्या कमाईत 12 पटीने वाढ

आज सोशल मीडियाचा वापर न करणारा एखादाच व्यक्ती सापडेल. एका रिपोर्टनुसार, जगभरातील 249 कोटी लोक सोशल मीडियाचा वापर करतात. जगातील लोकसंख्याच्या हे 39 टक्के आहे. सोशल मीडियामुळे अनेकजण एका रात्रीत स्टार झालेले आहेत. सोशल मीडियावर लाखो-करोडो फॉलोवर्स असणाऱ्यांना इनफ्लुएंसर म्हटले जाते. हेच लोक सोशल मीडियाद्वारे कोटी रुपये कमवत आहेत.

मार्केटिंग कंपनी आयजियाच्या रिपोर्टनुसार, वर्ष 2017 मध्ये सोशल मीडिया इनफ्लुएंसर्सना एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 134 डॉलर्स म्हणजेच 10 हजार रुपये मिळत होते. तर आता एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी 1682 डॉलर्स म्हणजेच जवळपास 1 लाख 20 हजार रुपये मिळत आहेत. मागील 5 वर्षात इंस्टाग्राम इनफ्लुएंसर्सची कमाई 12 पटीने वाढली आहे.

रिपोर्टनुसार, 2006 मध्ये एका स्पॉन्सर्ड ब्लॉगसाठी जेथे सरासरी 529 रुपये मिळायचे. तेथे आज 1 लाख 3 हजार रुपये मिळत आहेत. युट्यूबवर स्पॉन्सरशिप व्हिडीओची किंमत 2014 ला 30 हजार रुपये होती. जी आता जवळपास 4 लाख 79 हजार रुपयांपर्यंत पोहचली आहे.

ट्विटरवर स्पॉन्सर्ड ट्विटसाठी 2014 मध्ये 29 डॉलर्स (2 हजार रुपये) मिळायचे तर आता जवळपास 30 हजार रुपये मिळतात. फेसबुकवर आता एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी सरासरी 28 हजार रुपये मिळतात.

अशी होते सोशल मीडियावर कमाई –

सोशल मीडिया इनफ्लुएंसर्सची कमाई ही त्यांच्या फॉलोवर्स आणि स्बस्क्रायबर्सवर अवलंबून असते. कारण त्याच आधारावर कंपनी भागिदारी करते. भारतात चित्रपट इंस्डस्ट्रीमधील स्टार आणि क्रिकेटर्स सोशल मीडियाद्वारे मोठी कमाई करतात. याशिवाय ज्यांचे अधिक फॉलोवर्स आहेत, ते देखील सोशल मीडियाद्वारे पैसे कमवत आहेत.

 

Leave a Comment