लवकरच बाजारात दाखल होणार ह्युंडाईची नेक्सट जनरेशन आय20

ह्युंडाई लवकरच नवीन जनरेशन आय20 लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनी या प्रिमियम हॅचबॅक कारची टेस्टिंग करत आहे. नवीन ह्युंडाई आय20 चे टेस्टिंग दरम्यान फोटो लीक झाले आहेत. या नवीन कारमध्ये सनरूफ असेल. या सेगमेंटमध्ये हे फीचर असणारी ही पहिलीच कार आहे.

नेक्स्ट जनरेशन ह्युंडाई आय20 मध्ये प्रोजेक्टर हँडलँम्प, एलईडी डीआरएल, रेन सेंसिंग वायपर्स, ऑटो हेडलॅम्प्स, टर्न इंडिकेटर्ससोबत इलेक्ट्रिक एजस्टेबल आउट साइड रियर व्यू मिरर्स, नवीन ग्रिल, मोठे टायर, नवीन एलॉय व्हिल्ज आणि एलईडी टेललाइट सारखे फीचर्स आहेत.

कॅबिनबद्दल सांगायचे तर सध्या बाजारात असलेल्या मॉडेलपेक्षा नवीन आय20 मध्ये जास्त जागा आहे. याशिवाय प्रिमियम कारमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, फूल डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, क्रूज कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर आणि स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्स देण्यात आलेले आहे. नवीन ह्युंडाई आय20 मध्ये बीएस6 पेट्रोल आणि डिझेल इंजिन असेल. याशिवाय कारमध्ये वेन्यू एसयूव्ही 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे.

लूकबद्दल सांगायचे तर टेस्ट करण्यात आलेल्या कारचा लूक सध्या बाजारात असलेल्या मॉडेल सारखाच आहे. मात्र टेस्टिंग करण्यात येणारे मॉडेल सुरूवातीचे व्हर्जन आहे. कारच्या एक्सटिरियर आणि इंटेरियरमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. नवीन आय20 ऑटो एक्सपो 2020 मध्ये सादर केली जाईल.

 

Leave a Comment