Video : भन्नाट अ‍ॅक्शनमुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा गोलंदाज

अबूधाबी टी10 लीगमध्ये शनिवारी डेक्कन ग्लँडिएर्सने बांग्ला टायगर्सचा पराभव करत लीगमधील पहिला विजय नोंदवला आहे. बांग्ला टायगर्सने प्रथम फलंदाजी करताना 108 धावा केल्या. यानंतर शेन वॉटसनच्या 41 धावांच्या जोरावर डेक्कन ग्लँडिएर्सने 9.5 ओव्हरमध्येच सामना आपल्या नावावर केला.

या सामन्यात श्रीलकेंचा युवा फिरकी गोलंदाज केविन कोथिगोडाने पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच केविन आपल्या गोलंदाजीच्या शैलीमुळे चर्चेत आला आहे. गोलंदाजी करताना इतरांपेक्षा त्याची गोलंदाजी वेगळी आहे. केविनची गोलंदाजी समजणे फलंदाजांसाठी अवघड जात आहे. केविन कोथिगोडा डोक्याच्या मागून हात फिरवून गोलंदाजी करतो.

केविनची विचित्र गोलंदाजी बघून फलंदाज देखील हैराण झाले. आपल्या पहिल्याच सामन्यात केविनला विकेट नसले मिळाले, तरी देखील आपल्या हटके शैलीमुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.

केविनचा गोलंदाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 2007 मध्ये देखील अंडर-19 मध्ये खेळताना केविन आपल्या शैलीमुळे चर्चेत आला होता.

Leave a Comment