मतदान ओळखपत्रात चूक झाली असेल तर घरी बसून अशी करा दुरूस्त

देशात होणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र म्हणजेच वोटर कार्ड असणे गरजेचे आहे. अनेक वोटर कार्डसाठी अर्ज करताना नाव अथवा पत्ता चुकीचा भरला जातो. हे चुकलेले नाव अथवा जन्मतारीख दुरूस्त करण्यासाठी सरकारी ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागतात. अनेक लोकांच्या मतदान ओळखपत्रात नावात चूक झालेली असते. तर काहींचा पत्ता चुकीचा असतो. अशी चूक तुम्ही घरी बसल्या बसल्या देखील दुरूस्त करू शकता.

(Source)

यासाठी सर्वात प्रथम सरकारी वेबसाइट http://www.nvsp.in/ वर जा. त्यानंतर खालील बाजूला करेक्शन ऑफ एंटर इन इलेक्टोरल रोल या पर्यायावर क्लिक करा.

(Source)

यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर फॉर्म 8 उघडेल. ज्यावर तुम्हाला नाव, विधानसभा, राज्य इत्यादी माहिती द्यावी लागेल.

(Source)

तुम्ही फॉर्म जमा केल्यानंतर तुम्हाला एक ई-मेल येईल. ज्यामध्ये तुमच्या मतदान ओळखपत्राचे एप्लिकेशन आयडी असेल. या एप्लिकेशनद्वारे तुम्ही चूक दुरूस्त झाली की नाही, हे तपासू शकता. त्यानंतर तुम्हाला 30 दिवसांच्या आत मतदान ओळखपत्र मिळेल.

Leave a Comment