श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राजपक्षे यांचा विजय

श्रीलंकेतील राष्ट्रपती निवडणुकीत श्रीलंका पोडुजाना पेरमुना पक्षाचे उमेदवार गोताबेया राजपक्षे यांनी विजय मिळवला आहे. त्यांना 54 टक्के मते मिळाली. तर न्यू डेमोक्रेटिक फ्रंटचे (एनडीएफ) उमेदवार साजित प्रेमदासा हे दुसऱ्या स्थानावर राहिले.

श्रीलंकेत शनिवारी राष्ट्रतीपदासाठी निवडणुका पार पडल्या होत्या. श्रीलंकेत एकूण 25 जिल्हे आहेत. हे जिल्हे 9 प्रातांत आहेत. या निवडणुकीत जवळपास 1.6 कोटी पात्र मतदारांपैकी जवळपास 80 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

तामिळ बहुल उत्तर प्रांतात जवळपास 70 टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. जाफना जिल्ह्यात 66 टक्के, किलिनोच्ची जिल्ह्यात 73 टक्के, मुल्लातिवू 76 टक्के, वावूनियामध्ये 75 टक्के आणि मन्नारमध्ये 71 टक्के मतदान पार पडले. 2015 मध्ये मतदानाची टक्केवारी 81.52 टक्के होती.

गोताबेया राजपक्षे हे श्रीलंकेचे आठवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.

 

Leave a Comment