ओवेसी आणि बगदादी एकसारखेच – रिझवी

अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद विवादा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी वारंवार आपले मत मांडत आहेत. वक्तव्यांमुळे ओवेसी यांच्यावर अनेक नेते टीका करत आहे. साक्षी महाराज यांच्यानंतर आता शिया वक्फ बोर्ड प्रमूख वसीम रिझवी यांनी देखील ओवेसी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ओवेसी यांची तुलना थेट आयएसआयएसचा प्रमुख अबू बक्र अल बगदादीशी केली आहे. रिझवी यांनी आरोप केला आहे की, ओवेसी हे आपल्या भडकाऊ भाषणांमुळे आणि वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.

वसीम रिझवी म्हणाले की, ओवेसी आणि बगदादी यांच्यामध्ये काहीही फरक नाही. बगदादी सैन्य आणि शस्त्रांद्वारे दहशत पसरवतो तर ओवेसी हेच काम आपल्या वक्तव्यांवरून करत आहे. ते मुस्लिमानां दहशत आणि रक्तपाताकडे ढकलत आहेत. ओवेसी आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डावर प्रतिबंध घातला पाहिजे. हे दोघेही रूढीवादी मानसिकेतेला प्रोत्साहन देत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील विवादित जागा राममंदिरासाठी देण्याचा निर्णय दिला होता व मशिदीसाठी अयोध्येतच दुसरी पर्यायी 5 एकर जागा देण्यात येणार आहे. या निर्णयावर ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, मुस्लिम समाज 5 एकर जमीन स्वतः घेऊ शकतो. आम्हाला भीकेची गरज नाही, असे म्हटले होते.

Leave a Comment