या मेकअपमुळे ट्रोल झाल्या रानू मंडल

लता मंगेशकर यांचे गाणे ‘एक प्यार का नगमा है’ गायल्या नंतर रानू मंडल या एका रात्रीत प्रकाशझोतात आल्या. रानू मंडल सध्या इंटरनेटवर सेंसेशन झाल्या आहेत. त्यांना आपल्या आवाज आणि कलेच्या जोरावर केवळ चित्रपटात गाणी गाण्यास मिळाली. याशिवाय रियालिटी शोमध्ये पाहुण म्हणून जाण्याची संधी देखील मिळात आहे. गायक हिमेश रेशमियाने देखील त्यांना गाण्याची संधी दिली.

रानू मंडल प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी होताना दिसतात. नुकताच एका कार्यक्रमात रानू मंडल यांचा मेकओवर लूक पाहायला मिळाला. त्यांचा मेकअप बघूनच प्रत्येक जण दंग झाला. या इव्हेंटमध्ये त्या लहेंगा आणि ज्वेलरी घातलेल्या दिसून आल्या. त्यांच्या या लूकमध्ये सर्वात जास्त चर्चा त्यांच्या मेकअपची झाली. कारण त्यांचा मेकअप हा सर्वसाधारण स्किनटोन पेक्षा खूपच वेगळा होता.

त्यांच्या या अती मेकअपमुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. त्यांचे फोटो देखील व्हायरल होत आहे.

मेकअपवरून त्यांची आणि मेकअप आर्टिस्टची खिल्ली उडवली जात आहे.

Leave a Comment