मार्चपर्यंत एअर इंडिया, भारत पेट्रोलियमची विक्री – निर्मला सीतारमण

मार्च अखेरपर्यंत सरकारी मालकीच्या एअर इंडिया आणि ऑइल रिफायनरी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची (बीपीसीएल) विक्री प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सीतारमण यांनी ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, नवीन वर्षाच्या सुरूवातील या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीची प्रक्रिया पार पडेल. या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीमुळे सरकारला या आर्थिक वर्षात 1 लाख कोटींचा फायदा होईल.

सीतारमण म्हणाल्या की, एअर इंडियाची विक्री सुरू होण्याआधीच गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसत आहे. मागील वर्षी गुंतवणूकदारांनी एअर इंडिया खरेदीसाठी जास्त उत्सुकता दाखवली नव्हती. त्यामुळे याची विक्री टाळण्यात आली होती.

अर्थमंत्री म्हणाल्या की, आर्थिक मंत्रीतून बाहेर पडण्यासाठी वेळेनुसार, योग्य ती पावले उचलण्यात आलेली आहेत. यामुळे अनेक क्षेत्र आता मंदीतून बाहेर पडत आहेत. नवीन नियमांमुळे देखील जीएसटीच्या उत्पन्नात वाढ होईल

Leave a Comment